Published on
:
02 Feb 2025, 8:31 am
Updated on
:
02 Feb 2025, 8:31 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशाच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती केली आहे. ६ मार्च रोजी ते पदभार स्वीकारतील. ते आयडीएफचे २४ वे जनरल बनले आहेत, अशी माहिती इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर पोस्ट करुन दिली आहे.
हमासचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर मागील महिन्यात लष्करप्रमुख पदाचा हलेवी यांनी राजीनामा दिला होता. 'टाईम्स ऑफ इस्रायल'च्या मते, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारानंतर हलेवी यांचा राजीनामा आधीच निश्चित मानला जात होता. हलेवी यांनी जमीरचे अभिनंदन करताना म्हटले: "मी एयालला अनेक वर्षांपासून ओळखतो आणि मला विश्वास आहे की, ते पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आयडीएफचे नेतृत्व करतील. या जबाबदारीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो."
Prime Minister Benjamin Netanyahu and Defense Minister Israel Katz have agreed on the appointment of Maj.-Gen. (Res.) Eyal Zamir as the next IDF Chief-of-Staff.
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) February 1, 2025५९ वर्षीय एयाल झमीर २०२३ पासून संरक्षण मंत्रालयाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. हलेवी लष्कर प्रमुख झाल्यानंतर ते लष्करातून निवृत्त झाले होते. यापूर्वी त्यांनी डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले आहे. तसेच इस्त्रायल लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे.