महापालिका निवडणुकीसाठी आमची सर्व तयारी सुरु आहे. काँग्रेसचे महत्वाचे पदाधिकारी आमच्याकडे आलेली आहे. त्यावरूनच जनतेचा कल आणि नेत्यांचा कल ओळखू येतो. आता फक्त आठ लोक आले पुढच्या कालखंडात प्रचंड लोक आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहे. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा महापौर यावेळेस महापालिकेवर बसेल, असा विश्वास शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, महापालिकाची आमची तयारी सुरु झाली आहे. आम्ही लोकांपर्यंत जात आहोत आणि महानगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची ही सर्व जनतेच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही जनतेकडे जाऊनच विनंती करायला लागलेला आहे. केंद्रात सरकार आपले आहे, राज्यात सरकार आपला आहे, त्यामुळे महानगरपालिका जर आमच्या ताब्यात दिली तर निधी आणायला सोपे जाईल. त्यामुळे महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या, असे आवाहन अर्जुन खोतकर यांनी केले.
अर्थसंकल्पावर टीक, हे विरोधकांचे काम
अर्थसंकल्पवर बोलताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले, विरोधकांचा टीका करणे हे काम आहे. देशाचा अर्थसंकल्प हा निश्चितपणे आरसा असतो. त्यामध्ये देशाच्या विकासाचा प्रतिबिंब दिसत असते. जनता या अर्थसंकल्पावर खूश आहे. विरोधकांना काहीच संधी नसल्याने ते टीका करत आहे. त्यांनी त्यांची ही ड्युटी चांगली करावी, असा टोला आमदार अर्जुन खोतकर यांनी विरोधकांना लगावला.
हे सुद्धा वाचा
विरोधकांचा न्यायपालिकेवर विश्वास नाही…
ओबीसी आरक्षण सुनावणीवर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, आता विरोधकांचा न्यायपालिकेवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. न्यायपालिकेवर टिप्पणी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, हे फार दुर्दैवी आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बोलताना ते म्हणाले, डीपीडीसीची बैठक फक्त नियोजनाच्या मुद्याची होती. बाकीच्या इतर विषयावर सुद्धा सविस्तर चर्चा झालेली आहे. पंकजा मुंडे या पहिल्या पालकमंत्री आहेत की इतक्या सविस्तरपणे चर्चा झाली सर्व आमदारांना बोलावून त्यांनी बोलण्याची संधी दिली. खूप वेळ पंकजाताईंनी सर्वांना दिला. जिल्ह्याच्या विकासासाठी जवळपास 600 कोटी रुपयांचा निधी पंकजाताईंच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळेल, तशी मागणी त्या अजितदादा यांच्याकडे करतील.