या वेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बर्हाणपूरचे सरपंच बाळासाहेबत चांदगुडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ग्रामीण भागात ड्रोन फिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी व भीती लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण पोलिस दलालाकरिता 38 लाख रुपयांच्या दोन ड्रोन प्रतिबंधक बंदूक खरेदीकरिता मंजुरी देण्यात आली आहे, आणखी दोन ड्रोन प्रतिबंधक बंदूक उपलब्ध करून देण्यात येईल. गोजुबावी श्वान प्रशिक्षक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.