Dhananjay Deshmukh Namdev Shastri connected Bhagwangad : भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि देशमुख कुटुंबिय यांची भेट झाली. यावेळी महंतांनी धनंजय देशमुख यांची तगमग बघितली. त्यांचे सांत्वन केले आणि क्षणाचाही विलंब न करता एक मोठी घोषणा केली.
धनंजय देशमुख, महंत नामदेव शास्त्री, वैभवी देशमुख
मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात नाहक लक्ष्य करण्यात येत आहे. तर हत्येपूर्वी आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी अशा वक्तव्याने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर राज्यातून चोहोबाजूने टीकेची झोड उठली. त्यानंतर बाबांना आपली बाजू समजावून सांगण्यासाठी आज देशमुख कुटुंबिय गडावर पोहचले. त्यांनी महंतांची भेट घेतली. त्यांनी संतोष देशमुख यांच्या खूनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठाचा महाराजांपुढे मांडला. आरोपींच्या गुन्ह्याचा पाढा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न केला. धनंजय देशमुख यांच्या आर्त हाक नामदेव शास्त्री यांनी ऐकली. त्यांनी लागलीच भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले.
बातमी अपडेट होत आहे…