नित्यानंद कॉलनीत प्लास्टिक बंदी; प्रदूषण, अस्वच्छतेपासून सुटका:महिला स्वत: कापडी पिशव्या शिवून करतात वाटप; सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पैसे गोळा करून आणले भांडे
4 hours ago
1
सिंगल यूज प्लास्टिकचा सर्वत्र सर्रास वापर सुरू असताना अमरावती शहरात साईनगर परिसरातील अकोली रोड भागात असलेल्या नित्यानंद कॉलनीतील नागरिकांच्या पुढाकाराने येथे मागील १५ वर्षांपासून काटेकोरपणे प्लास्टिक बंदीचे पालन केले जात आहे. परिणामी, या भागात हिरवळ, प्रदूषणरहित स्वच्छता, सौहार्दपूर्ण सामाजिक वातावरण, जलसमृद्धी, स्वच्छ नाल्या दिसून येत आहेत. लग्न, बारसे, गौरी गणपती, वाढदिवस, स्नेहमिलन, साक्षगंध, एखादा समारंभ, तेरवी असा कोणताही कार्यक्रम असला तरी सिंगल यूज प्लास्टिकपासून निर्मित पत्रावळी, ताट, वाट्या, ग्लास, प्लेटचा येथे वापरच केला जात नाही. शहरातच एकिकडे प्लास्टिक बंदीसाठी नियमितपणे कारवाया सुरू असताना नित्यानंद कॉलनीने शहरातील नागरिकांसमोर यातून एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. राज्यात प्लास्टिक बंदीच्या पोकळ गप्पा हाकल्या जात असताना येथील ४० कुटुंबांनी सहकार, पर्यावरण रक्षण, आदर्श सवयींचा पुरस्कार करण्याचे ठरवले. प्रा. संजय धोपटे, दिनेश देशमुख, प्रल्हाद मुंदे, अतुल वानखडे, नंदू पिंपळगावकर, निशाणे, सुनील निमकार्डे, दत्ता खेडकर, सतांगे यांनी पुढाकार घेत परिसरात प्लास्टिकचा वापर होणार नाही, यासाठी जनजागृती केली. मात्र, कोणावरही जबरदस्ती केली नाही. सुनीता धोपटे, वर्षा ढेरे, अनिता निशाने, अक्षता महाजन, शिल्पा निमकर्डे, शीतल शहाडे, वैशाली सातंगे, सरिता खेडकर, प्राजक्ता देशमुख, विनिता ठाकरे, शोभा वानखडे, रुपाली वानखडे या महिलांनी कॉलनीतील इतर महिलांना एकत्र आणून प्रत्येकी २०० रुपये वर्षाला गोळा करण्यास सुरुवात केली. यातून स्टीलचे ताट, वाट्या, ग्लास, इतर भांडी खरेदी केली. ‘नो कॅरीबॅग’ असा संदेश देत घरातील कापडापासून पिशव्या शिवून त्याचे वाटप केले. कोणाकडे पिशव्या नसतील तर त्यांना या महिला कापडी पिशव्या देतात. १५ वर्षांपूर्वी आम्ही सुरुवात केली आता इतरांनीही करायला हवी आपणही पर्यावरणाचे काही देणे लागतो यासह प्लास्टिक मनुष्यासाठीही हानिकारक आहे, याची जाण ठेवून आम्ही सिंगल यूज प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तू आयुष्यभर वापरायच्या नाहीत, असा निर्धार केला. नित्यानंद कॉलनीतील २०० नागरिक याचे काटेकोरपणे पालन करतात. १५ वर्षांपूर्वी आम्ही सुरुवात केली, इतरांनीही करावी, असे आम्हाला वाटते. -सुनीता संजय धोपटे, प्लास्टिक बंदीचे पुरस्कर्ते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
नित्यानंद कॉलनीत प्लास्टिक बंदी; प्रदूषण, अस्वच्छतेपासून सुटका:महिला स्वत: कापडी पिशव्या शिवून करतात वाटप; सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पैसे गोळा करून आणले भांडे