निम्मे वर्ष सरले तरी स्काउट गणवेशाची‎ प्रतीक्षा:3000 शाळांचा शिलाईस नकार‎; राज्य शासनाच्या धरसोडीच्या धोरणाचा 2.12 लाख विद्यार्थ्यांना फटका‎

2 hours ago 1
यंदाचे अर्धे शैक्षणिक वर्ष उलटले तरी २.१२ लाख‎विद्यार्थ्यांना अद्याप स्काऊट गाईडचा दुसरा गणवेश‎मिळालेला नाही. हा गणवेश शाळा व्यवस्थापन‎समितीस्तरावर शिलाई करण्याचे निर्देश होते. परंतु,‎सुमारे ३ हजार जि. प. शाळास्तरावरून गणवेश‎शिलाईस नकार देण्यात आला. जिल्हास्तरावर निर्णय‎घेण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कळवले आहे.‎आता शिक्षण विभागाने महिला विकास महामंडळाला‎पत्र पाठवले, असले तरी शिलाई कोण करणार यावर‎अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.‎ विद्यार्थ्यांचे दोन्ही गणवेश यापूर्वी शाळा स्तरावरच‎उपलब्ध करून दिले जात होते. परंतु, राज्याने एक‎गणवेश योजना आणून कापडाचा पुरवठा केला. हे‎कापड महिला बचत गटांकडून शिलाई करून प्रत्येकी‎दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला. परंतु, निर्णयातील‎धरसोडीमुळे स्काउटचा गणवेश शिलाईची जबाबदारी‎पुन्हा शाळा समितीवर सोपवण्यात आली होती. पैकी‎एक गणवेश १.९२ लाख विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला.‎पण दुसरा ‘स्काउट’चा गणवेशाची शिलाई कोणी‎करायची यावर निर्णय झाला नाही. गणवेशासाठी ११०‎रूपये शिलाई दिली जाणार होती, पण‎शाळास्तरावरून नकार देण्यात आला. त्यामुळे आता‎जिल्हास्तरावर निर्णय‎घेण्याचे कळवले. त्यानुसार‎शिक्षण विभागाने महिला‎आर्थीक विकास मंडळाला‎पत्र देऊन स्काउट गणवेश‎शिलाईबाबत विचारणा केली.‎पण मंडळानेही याबाबत‎निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ‎कार्यालयाला मार्गदर्शन‎मागवले आहे. त्यामुळे यंदा‎शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी‎दुसरा गणवेश मिळण्याची‎आशा धूसर झाली आहे.‎ बचतगटांकडून शिलाई करू‎ गटशिक्षणाधिकाऱ्यांनी , शाळास्तर गणवेश शिलाईस तयार‎नसल्याने जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे कळवले आहे.‎त्यानुसार स्काउट गणवेशाबाबत आम्ही महिला आर्थिक‎विकास महामंडळाला शिलाईसाठी पत्र दिले आहे. ते तयार‎असतील तर त्यांच्याकडून शिलाई करून घेऊ. अन्यथा‎तालुकास्तरावर निविदा मागवून बचतगटाला ते काम देऊ.‎ -भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक.‎ मुख्यालयाची परवानगी घ्यावी लागेल‎ स्काउट गणवेश शिलाई करण्याबाबत शिक्षण विभागाने‎आम्हाला पत्र दिले आहे. पण शिलाई करण्याचे थेट‎अधिकार आम्हाला नाही. याबाबत मुख्यालयाची परवानगी‎घ्यावी लागते. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच आम्ही‎मंडळाच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र‎पाठवले आहे. चारशे गट आमच्याकडे शिलाई करणारे‎आहेत. - संजय गरजे, जिल्हा समन्वय, महिला विकास मंडळ.‎ जिल्ह्यातील १२ हजार विद्यार्थ्यांना‎अद्याप एकही गणवेश नाही‎ नियमीत गणवेश वितरणाच्या अहवालानुसार‎गणवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या २ लाख १२‎हजार ७३३ आहे. त्यापैकी महिला विकास‎मंडळाकडून १ लाख ९२ हजार ९३६‎विद्यार्थ्यांचे गणवेश शिलाई करून पुरवठा‎करण्यात आले. अजूनही १२ हजार ७८४‎विद्यार्थ्यांपर्यंत एकही गणवेश पोहोचला नाही.‎तर एकूण २.१२लाख विद्यार्थी दुसऱ्या‎गणवेशापासून वंचित आहेत.‎ गणवेशाबाबत नेमकं घडलंय काय ?‎ शासनाने एक गणवेश योजना आणून कापडाचा पुरवठा‎करून प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला.‎कापड उशिरा पोहोचल्यामुळे पहिला गणवेश पोहोचण्यासाठी‎शाळा सुरू झाल्यानंतरही एक महिना उलटला. त्यानंतर‎दुसऱ्या स्काउट गणवेशाचे कापड उशिरा मिळाले. मग‎शासनाने शाळा समितीला ते गणवेश शिवायचे निर्देश दिले.‎परंतु, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनही जिल्हास्तरावर निर्णय‎घेण्याचे कळवले, पण अंतिम निर्णय झाला नसल्याने,‎विद्यार्थी स्काउट गणवेशापासून वंचित राहिले आहेत.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article