निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्का:आमदार बबन शिंदे, विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला; 'तुतारी' हाती घेण्याची रंगली चर्चा

2 hours ago 1
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून कोणत्याही क्षणी निवडणुकीची तारीख घोषित होऊ शकते. यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडोमोडी घडत असून सर्वच पक्षातील नेते उमेदवारीसाठी धडपड करत आहेत. अनेक पक्षातील नेत्यांच्या इतर पक्षातीन नेत्यांसोबत भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. अशात अजित पवार गटाचे नेते आणि माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. या भेटीमुळे आमदार बबन शिंदे हाती तुतारी घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार लांडे नगरसेवकांसह पवारांच्या भेटीला विशेष म्हणजे बबन शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र, आता ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे आणि विनोद नडे या चार नगरसेवकांसह शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. बबन शिंदे आणि विलास लांडे हाती तुतारी घेणार? आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार विलास लांडे दोघेही अजित पवार गटात आहेत. मात्र, हे दोन्ही नेते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवारांच्या भेटीनंतर आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी तुतारी हाती घेतल्यास, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जाईल. दरम्यान, राजन पाटील यांनी देखील कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. आमदार नगरसेवक पवारांच्या भेटीला याआधी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले आमदार आणि नगरसेवक शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत. यामध्ये अकोले येथील अमित भांगरे यांचा समावेश आहे. अमित भांगरे हे अकोले मतदारसंघातून आमदार किरण लहामटे यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भांगरे आपल्या आईसह शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. शरद पवार गटाचे आष्टी-पाटोदा विधासभाप्रमुख राम खाडे हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. राम खाडे हे अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्या अनुषंगाने ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल झाले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article