पंढरपूर विधानसभा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार ( दि.२० ) रोजी मोठ्या चुरशीने मतदान झाले. सायंकाळी ८ वाजेपर्यंत अनेक गावात मतदान सुरू होते. दरम्यान यावेळी महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. महिलांच्या मतांचे प्रमाण वाढले तर त्याचा कुणाला लाभ होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे, काँग्रेसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे अनिल सावंत आणि मनसेचे दिलीप धोत्रे हे प्रमुख उमेदवार होते. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरी झाले. मात्र सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने झाले. अनेक केंद्रावर मतदार तुरळक होते. मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. विशेषतः महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान कमी झाले होते. मात्र सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाले होते तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत बोहाळी ८२ टक्के, गादेगाव ७५ टक्के, खर्डी ७८ टक्के, कोर्टी ८१ टक्के, तावशी ७८ टक्के, वाखरी येथे ७६ टक्के, नंदेश्वर ७१ टक्के, उचेठाण ७९ टक्के, कौठाळी ८४ टक्के मतदान झाले आहे. प्रतिनिधी |करमाळा तालुक्यातील ११८ व माढा तालुक्यातील ३६ अशा एकूण १५४ गावांचा असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६७.८५ टक्के मतदान झाले. तब्बल ३४७ बुथच्या माध्यमातून सदरची प्रक्रिया पार पडली. सकाळी संथगतीने सुरुवात झालेली ग्रामीणमध्ये मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे. तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख ३९ हजार ४९२ मतदान पूर्ण झाले होते. त्याची एकूण टक्केवारी ४२.४० सांगण्यात आली. सायंकाळी उशिरा करमाळासह माढा तालुक्यातील ३६ गावांत मतदानासाठी रांगा होत्या. सायंकाळीच्या वेळी मतदानाचा टक्का वाढला. त्यानुसार मतदान संपेपर्यंत मतदानाचा टक्का इथपर्यंत जाऊन पोहोचला. तालुक्यातील पोथरे, आळजापूर, बिटरगाव, जातेगाव, खडकी या भागात दुपारी तर पारेवाडी, जेऊर, पांडे, वाशिंबे या गावांत सायंकाळी मतदानासाठी गर्दी पाहायला मिळाली. करमाळा शहरात सकाळी कमी असलेली गर्दी दिसून आली. दुपारी थोडी शांतता होती. सायंकाळच्या वेळी वाढलेली दिसून आली. पंढरपूर मतदारसंघात सायंकाळी उशिरा मैदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालय जवळील मतदान केंद्र ५३ वर सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मतदारांच्या दोन मोठ्या रांगा होत्या. वीजपुरवठा खंडित झाला होता. काही मिनिटांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. हा अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार झाल्याचे दिसून आले नाही. पंढरपुरात उपजिल्हा रुग्णालयाजवळील केंद्रात वीज गूल
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)