पंढरपूरमध्ये पाठिंब्यासाठी हजारो समाजबांधव:धनगर समाज आरक्षणासाठी 15‎ दिवसांपासून सुरू आहे आंदोलन‎

2 hours ago 1
अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेशासाठी गेल्या १५ दिवसांपासून पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी मंगळवारी हजारो धनगर समाज बांधव उपस्थित होते. कोणताही मोठा नेता आलेला नसताना समाजबांधव दिवसभर पंढरपूरमध्ये उपस्थित होता. पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी सहा जण ९ सप्टेंबरपासून उपोषणास बसले आहेत. सोमवारी रास्ता रोको केल्यानंतर मंगळवारी पंढरपूर येथे उपोषणस्थळी समाजाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास राज्य स्तरावरील एकही महत्त्वाचा नेता आला नव्हता. मात्र सांगोल्याचे नेते बाबासाहेब देशमुख, माळशिरसचे नेते उत्तम जानकर, माढ्यातील शिवाजी कांबळे, सोलापूरचे माजी नगरसेवक चेतन नरोटे, यांच्यासह हजारो समाज बांधव आंदोलन स्थळी आले होते. मनोज जरांगे यांनी कधीही धनगर आरक्षणास विरोध केला नाही. मात्र ओबीसीं नेत्यानी कधीही धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही, असा मुद्दा उपस्थित करून धराशिवचे कार्यकर्ते सुरेश कांबळे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर नाव न घेता टीका केली. विनाकारण दंगली घडवण्यासाठी जरांगे पाटलांच्या समोर जाऊन आंदोलने सुरू आहेत. जरांगे यांच्या समोर काही लोक केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलन उपोषण करत आहेत, असा आरोप करून ओबीसी तुमचं भांडवल असेल पण धनगर समाजाला वापरू नका, असे आवाहन कांबळे यांनी यावेळी केले. पंढरपुरमधील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी समाजबांधव जमले होते. जरांगे-पाटील यांचा कायमच धनगर आरक्षणाला पाठिंबा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article