पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीची तारीख आणि ठिकाण ठरलं(File Photo)
Published on
:
04 Feb 2025, 2:06 am
Updated on
:
04 Feb 2025, 2:06 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये भेटणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापासून ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीबद्दल अटकळ बांधली जात होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा असेल. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर काही आठवड्यांतच वॉशिंग्टन डीसीला द्विपक्षीय भेटीसाठी जाणारे निवडक परदेशी नेत्यांमध्येगी पंतप्रधान मोदी असतील.