पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे २८ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 12:51 pm
Updated on
:
23 Jan 2025, 12:51 pm
पनवेल: पुढारी वृत्तसेवा: पनवेल तालुक्यातील विचुंबे गावात अन्न व औषध प्रशासनाने आज (दि. २३) मोठी कारवाई करत २८ लाखांचा गुटखा जप्त केला. यावेळी एकाला अटक केली. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक जावक होत असल्याची माहिती, मुंबई अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी साडे सातच्या सुमारास विचूंबे गावात स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. गुटखा ठेवलेल्या गोडाऊनमध्ये धाड टाकली असता एक व्यक्ती आढळून आली. तसेच गुटखा, पान मसाला तसेच अन्य सुगंधी मसाले आढळून आले. या कारवाईत जवळपास २८ लाखांचा गुटखा तसेच एक मोटारसायकल जप्त केली आहे.
विचुबे गाव ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते, त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास २५ हून अधिक पान टपऱ्या आहेत. सकाळ पासून एकही टपरी उघडण्यात आली नव्हती. त्यामुळे आज कारवाई होणार असल्याची खबर पान टपरी व्यावसायिकांना लागली होती का ? याची चर्चा सर्वत्र सुरू होती.