पराभव पचवत जिद्दीने उभे राहिल्याने ठरले ‘अजित’:शरद पवारांच्या आमदारांना फोडू शकतात

3 hours ago 1
लोकसभेला बारामतीत पत्नी सुनेत्रा यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार अक्षरश: गर्भगळीत झाले होते. पण काही दिवसांनी पराभव पचवत ते जिद्दीने उभे राहिले. त्याचा त्यांना लाभ मिळाला. शरद पवारांविरोधी वक्तव्ये टाळली 1 लोकसभेतील पराभवानंतर काही काळ खचल्यासारखे दिसले. पण अखेरच्या टप्प्यात जिद्दीने मैदानात उभे राहिले. 2 शरद पवारांविषयी विरोधी वक्तव्य करणे टाळले. उलट त्यांच्याविषयी सन्मानाची वक्तव्ये सातत्याने केली. 3 लाडकी बहीण योजनेचा प्रभावी प्रचार केला. जागावाटपात भाजप तसेच शिंदेसेनेशीही अनेक मतदारसंघांत जुळवून घेतले. 4 मूळ राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे आपणही शिव-शाहू-फुले-आंबेडकरवादी असल्याचे वारंवार सांगितले. २०१९च्या विधानसभेला शरद पवारांकडेच नेतृत्व असल्याने फार जबाबदारी नव्हती. ते बारामतीपुरतेच मर्यादित राहिले होते. सत्तेच्या हव्यासापोटी पवार कुटुंब फोडले, विचारधारा सोडली या प्रचाराला अखेरपर्यंत ठोस उत्तर देता आले नाही. लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेऊन विधानसभेत जागावाटपाचा आग्रह धरला नाही. ५९ जागांवर समाधान मानले. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी पक्ष मजबूत करतील. शरद पवार गटाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न असेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article