पराभवामुळे माझे नव्हे, जनतेचे नुकसान:आत्मचिंतन करुन कामात सुुधारणा करु

2 hours ago 1
बार्शी तालुक्यात येत्या १ वर्षात ५० हजार एकर बागायत, सहा वर्षात १ लाख एकर बागायत क्षेत्र करण्याचा तसेच वैरागचा संतनाथ कारखाना सुरू करण्याचे स्वप्न मी पाहिले होते. आमदार म्हणून काम करताना एक उत्साह व वेग असतो. त्याला आता काही मर्यादा येतात. या निवडणूकीत माझ्यावर जळणारांनी सूड उगविण्याचा प्रयत्न केला. संबंधितांमुळे वैयक्तिक काहींही नुकसान झालेले नाही. त्यांनी या तालुक्यातील गोरगरीब जनतेने नुकसान केलेले आहे फक्त याचेच वाईट वाटते अशी भावना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. बार्शी विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी विरोधकांना इशाराही दिला. माजी आमदार राऊत म्हणाले, सर्वसामान्य जनतेने मला मतदान केले आहे. माझा पराभव हा माझ्या विरोधकाकडून झालेला नाही. पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमधील हेवेदावे, मत्सर यातून याचे पाय ओढल्यानंतर त्याची जिरेल या द्वेषभावनेतून झालेल्या कुरघोडयाचा फटका आम्हाला बसला आहे. याबाबतीत पक्षांतर्गत बैठक घेवून आत्मचिंतन करू. यात काय सुधारणा करायचा त्या आम्ही करू. बार्शीत आपण ज्या काही योजना आणल्या, विकासकामे सुरू केलेली होती. ती कामे सुरू राहतील. बार्शी तालुक्यातील जनतेने ज्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी टाकली आहे. त्यांनी संतनाथ कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. काही सहकार्य लागले तर मी करेन अशी ग्वाही राऊत यांनी दिली. निकालानंतर राऊत यांची भूमिका

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article