पाकमध्ये हिंदूंना एटीएम; महिन्याला 3,500 अर्थसहाय्यPudhari File Photo
Published on
:
24 Jan 2025, 1:31 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:31 am
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तानात हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांना एटीएम कार्ड देण्यात आली आहेत. अल्पसंख्याकांना त्या महिन्याला 3 हजार 500 रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी अल्पसंख्याक समुदायासाठी मुख्यमंत्री एटीएम योजना लाँच केली आहे. मरियम यांच्या हस्ते हिंदूंसह शिखांनाही एटीएमचे वितरण केले. मरियम यांनी काही महिन्यांपूर्वी अल्पसंख्याक समुदायासाठी एटीएम योजना करण्याची घोषणा केली होती. अल्पसंख्याकांना टप्प्याटप्प्याने रक्कम वाढविणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. पंजाब प्रांतातील 50 हजार अल्पसंख्याक कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसर्या टप्प्यात आणखी 25 हजार अल्पसंख्याक लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. अल्पसंख्याकांचे जीवन सुकर करण्यासाठी विविध योजना हाती घेणार असल्याचेही मरियम यांनी नमूद केले.