पाण्याची टाकी उभारण्याकरिता बक्षीसपत्र करून दिली मोफत जागा:भाजप तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांनी जागेचे करुन दिले बक्षीसपत्र

2 hours ago 1
शिवणगीचे भूमिपुत्र भाजपचे तालुकाध्यक्ष तथा दामाजी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांच्या मालकीचीजागा जलजीवन योजनेची कामे करण्यासाठी विना मोबदला देऊन शासकीय योजनेला हातभार लावला, त्याबद्दल त्यांचा पंचायत समिती व ग्रामपंचायत शिवणगी व ग्रामीण पाणीपुरवठा मंगळवेढा यांच्या वतीने सत्कार केला. यावेळी गटविकास अधिकारी योगेश कदम, विस्तार अधिकारी मधुसूदन डोरले, सोड्डीचे सरपंच शांतप्पा बिराजदार, येळगीचे सरपंच सचिन चव्हाण, शिवनगीच्या ग्रामसेविका शारदा जामगुंड उपस्थित होते. कुलकर्णी यांनी स्वतः दोन गुंठे जागा ग्रामपंचायतला मोफत बक्षीस पत्र करून देऊन गावच्या विकासाला चालना दिली आहे, तसेच कुलकर्णी यांनी या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून जर व्यवस्थित पाणी आले नाही किंवा पाणी कमी पडले तर स्वतःच्या शेतातील विहिरीतून पाणी मोफत देतो असे अभिवचन दिले आहे. जलजीवनचे काम पूर्ण होईल, निधी परत जाणार नाही जलजीवनचे कामे करत असताना प्रामुख्याने पाण्याची टाकी बांधणे व विहिरीसाठी जागा मिळणे कठीण जाते, त्यामुळे जल जीवन ची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत निधी परत जातो, ग्रामीण भागातील नागरिकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जागा बक्षीस पत्र करून दिल्यास योजना वेळेत पूर्ण होतील. त्यामुळे निधी परत जाणार नाही असे अंबादास कुलकर्णी यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article