भरधाव टेम्पोच्या धडकेत आश्रमशाळेतील एक विद्यार्थी ठार File Photo
Published on
:
23 Sep 2024, 3:22 pm
Updated on
:
23 Sep 2024, 3:22 pm
कासा : डहाणू तालुक्यातील तवा येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव टेम्पोने धडक दिली. या धडकेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी आहे. जखमी विद्यार्थ्यांवर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुधीर दिलीप पुंजारा (वय १७ वर्षे) अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.