पुण्यात आदिवासी कला-संस्कृतीचे अनोखे दर्शन:वारली, गोंड चित्रे ते नागा दागिने; युनिव्हर्सल ट्रायब्स् बिग ग्रीन फेस्टमध्ये आदिवासी कलेचा ठेवा
6 hours ago
1
पुण्यातील घोले रोड येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये युनिव्हर्सल ट्रायब्स्, अलर्ट आणि आर्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'युनिव्हर्सल ट्रायब्स् बिग ग्रीन फेस्ट २०२५' मध्ये आदिवासी कला आणि संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडले. खासदार वंदना चव्हाण आणि डॉ. रमेश रघतवान यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाची सुरुवात पारंपरिक गोफ नृत्यशैलीने झाली, त्यानंतर लेझीम नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रदर्शनात आदिवासी जीवनशैलीचे विविध पैलू दाखवणारी वारली आणि गोंड चित्रे, आसामी बांबूपासून बनवलेली भांडी व शोभेच्या वस्तू, ढोकरा शिल्पकला, नागा पद्धतीचे दागिने आणि वन्य वनस्पतींपासून बनवलेले औषधी पदार्थ ठेवण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक रजत रघतवान यांनी सांगितले की, या प्रदर्शनाद्वारे आदिवासी समुदायातील नायकांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून, आदिवासी कला आणि संस्कृती जतन करण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, गणेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनातून पुणेकरांना आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून घेण्याची अनोखी संधी मिळाली. विशेषतः कपड्यांवरील नक्षीकाम, बांबू हस्तकला आणि पारंपरिक दागिन्यांमधून आदिवासी कलेचे वैभव पाहायला मिळाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)