पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांत वाढ:राज्यातील रुग्णसंख्या 67 वर; 13 व्हेंटिलेटरवर, 24 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
3 hours ago
1
राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत हा आकडा 67 वर पोहोचला असून, त्यापैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 24 जणांवर आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सदर रुग्ण आढळलेल्या परिसरातील इतर रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत गुइलेन बॅरे सिंड्रोमचे एकुण 67 रुग्ण आढळलेत. त्यात 43 पुरुष व 24 महिला आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण हे पुणे व परिसरातील आहेत. पुणे ग्रामीणमध्ये आतापर्यंत या सिंड्रोमचे 39 रुग्ण आढळलेत. तर पुणे महापालिका हद्दीत 13, तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 12 रुग्ण आढळलेत. यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या 64 वर पोहोचलेत. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे. या सर्वेक्षणांतर्गत गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणी शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या माध्यमातून रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांची पाहणी केली जात आहे. संशयित रुग्णांचे शौचनमुने व रक्तनमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवण्यात येत आहेत. काहींचे पाठवण्यातही आलेत. याशिवाय पुण्यातील विविध भागांतील पाण्याचे नमुणे रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. सिंहगड रस्ता परिसरातील बहुतांश रुग्ण पुण्यात आढळलेले रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरातील आहेत. त्यामुळे त्यांच्या पिण्याचा पाण्याचा स्त्रोत एकच होता का, याचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. याचवेळी त्यांनी एकाच परिसरात खाद्यपदार्थ खाल्ले होते का, याचाही शोध घेण्यात येत आहे. काही रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी हा जीवाणू संसर्ग समोर आला आहे. या जीवाणूचा संसर्ग हा प्रामुख्याने दूषित पाणी अथवा अन्नातू होतो. हा संसर्ग झाल्यानंतर अतिसार, पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. हे रुग्ण 1 ते 3 बरे होतात. गुइलेन बॅरे सिंड्रोमसंबंधी काय काळजी घ्यावी? गुइलेन बॅरे सिंड्रोमचा संसर्ग होणार नाही यासाठी आरोग्य विभागाने जनतेला योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी नागरिकांनी खालील काळजी घ्यावी. हे ही वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)