पुण्यात देशातील पहिली स्वदेशी 'अनामया' एमआरआय मशीनचे अनावरण:मेक इन इंडिया अंतर्गत एआय तंत्रज्ञान

1 hour ago 1
रुबी मेडिकल सर्व्हिसेस तर्फे राज्यात विविध ठिकाणी एमआरआय मशीन अनेक वर्षापासून कार्यरत करण्यात आल्या आहे. मात्र, एमआरआय मशीन्सची किंमत महागडी असल्याने तसेच त्याचे पार्टस परदेशातून आयात करावे लागत असल्यामुळे ते खार्चिक असते. त्यामुळे रुबी मेडिकल सर्व्हिसेसने अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानात कार्यरत असलेल्या रेफेक्स समूहाच्या आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील थ्रीआय मेडटेक यांच्या मदतीने मेक इन इंडिया अंतर्गत एआय तंत्रज्ञान अधारित देशातील पहिली स्वदेशी बनावटीची १.५ टी एमआरआय मशीन ‘अनामया’ निर्माण केली आहे. ही मशीन संगमनेर येथील रुबी मेडिकल सर्व्हिसेस मध्ये बसविण्यात येणार असल्याची माहिती रुबी हाॅल क्लीनिकचे अध्यक्ष डाॅ.पी.के.ग्रांट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रुबी हाॅल क्लिनिकचे विश्वस्त डाॅ.सिमाॅन ग्रांट, नताली ग्रांट नंदा, मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खाेडाईजी, डाॅ.प्रणव महादेवकर,पद्यश्री डाॅ.हर्ष महाजन उपस्थित हाेते. डाॅ.पी.के.ग्रांट म्हणाले, अनामया एमआरआय मशीन हे प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानासह अचूक निदान प्रदान करते, त्याचबराेबर जलद स्कॅन, रुग्णांसाठी अधिक सुलभ व किफायतशीर आहे. स्पष्ट प्रतिमा व निदान अचूकता यामुळे रेडिओलाॅजिस्टच्या वैद्यकीय गरजा सहज पूर्ण हाेत आहे. एमआरआय काढताना मशीन मधील आवाज ९६ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. एआय तंत्रज्ञानामुळे डिजीटल अचूकता साधता येते. ४० वर्षापूर्वी आम्ही ०.५ टी एमआरआय मशीन सुविधा रुग्णांसाठी सुरु केली परंतु नंतरच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित अनेक बदल एमआरआय मशीन मध्ये झाले असून आता जपान, युराेपचे तंत्रज्ञान यावर अवलंबून न राहता मेक इन इंडिया मशीनच्या माध्यमातून काम करता येईल. एमआरआय मशीन २४ तास सुरु ठेवावे लागत असल्याने त्याचा वीजबील खर्च देखील अधिक असताे परंतु नवीन मशीन मध्ये वीज वापर तीनपट कमी करण्यात आला आहे. तसेच हेलियम वापर खर्चिक हाेताे ताेदेखील संपुष्टात आणला आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांचा स्कॅनिंग वेळ देखील कमी करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article