पुण्यात माजी नगरसेविकाचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला:बापूसाहेब पठारे यांच्याकडून निषेध, कारवाईची मागणी
2 days ago
1
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कार चालक सचिन गायकवाड मंगळवारी दुपारी एमएसईबी ऑफिसकडे जात होते. त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठिमागून कारवर दगड मारला. तेव्हा कार चालक घाईगडबडीत खाली उतरले व पाठिमागे गेले, त्याचवेळी समोरून देखील सिमेंटचा गट्टू काचेवर कोणीतरी मारून तोडफोड केली. या दगडफेकीत चंद्राकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, याघटनेमुळे वडगाव शेरी परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती पाहणी आहे.बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालयात टिंगरे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची जलद तपासाची मागणी केली.तसेच वरिष्ठ नेत्यांना हल्ल्याची कल्पना दिली.रेखा टिंगरे यांनी 2022 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर चार महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.परंतु सहा दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आणि वडगावशेरी मध्ये आघाडीचे उमेदवार यांचा प्रचार सुरू केला. याबाबत बापूसाहेब पठारे म्हणाले,निवडणूक मतदानाला काही तास उरले असताना महत्वाच्या नेत्यावर,कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. हिंसेचा आधार घेऊन कोणी धमकावत असेल तर त्यांचे मनोदय यशस्वी होणार नाहीत.ही संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. निर्भय बनून हिंसेचा प्रतिकार केला जाईल आणि लोकशाहीच्या मार्गाने हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)