पुण्याहून मोठ्या विमानांचे उड्डाण शक्य:पुणे विमानतळाचा ओएलएसचा अहवाल सकारात्मक, केंद्रीय ⁠राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

2 hours ago 1
सर्वात मोठ्या आकारमानाची विमाने म्हणजे ‘ई’ कॅटेगेरीतील विमानांचे विमानतळावरून उड्डाण करता येईल अथवा कसे याबद्दल ‘ऑबस्टॅकल लिमिटेशन सर्व्हे’ म्हणजेच ओएलएस केला जातो. पुणे विमानतळाबद्दलचा ओएलएस विक्रमी वेळात पूर्ण झालेला असून त्याचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. याच संदर्भातील पुढील कार्यवाही करण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उच्चस्तरिय बैठक घेत पुढील प्रक्रियेसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विकासकामे व सोयीसुविधानिर्मिती आणि भूसंदापदानासाठीच्या प्रक्रियाचा मार्ग खुला झाला असून पुण्याहून लवकरच मोठ्या विमानांचे उड्डाण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे विमानतळ प्रकल्पाबाबत दिल्लीतील नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या कार्यालयात राज्यमंत्री मोहोळ यांच्या अद्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव वुम्लानमंग वुलनाम, संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती दीप्ती मोहिल चावला, विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षा, एम. सुरेश, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकोंडवार, ग्रुप कॅप्टन मनोज राणा, एअर मार्शल वाय.के. दीक्षित, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके आणि इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार आणि इतर सुविधांच्या बांधकाम आणि तांत्रिक बाबींसंदर्भात चर्चा उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत झाली. या बैठकीत ओएलएसच्या अहवालाची माहिती दिली. पुण्याहून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी कोड 'ई' विमानांची (म्हणजे सर्वात मोठ्या आकाराची) उड्डाणे सुलभ यावीत यासाठी करावयाच्या पुढील विकास कामांचे करण्यासंदर्भात चर्चा यावेळी झाली. या बैठकीत राज्य सरकारकडून करण्यात येणारे भूसंपादन, संरक्षण मंत्रालयाकडून करून घ्यावयाचे जमिनीचे हस्तांतरण, एप्रन क्षेत्र, धावपट्टीची लांबी, नवीन टर्मिनल इमारत याचसोबत अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाशी संबंधित इतर सर्वेक्षण करून संरक्षण मंत्रालयाला सहकार्य करण्याचे निर्देश भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिले असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article