पोलीस असल्याचे सांगून १ लाख २० हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविलेpudhari photo
Published on
:
22 Jan 2025, 2:20 pm
Updated on
:
22 Jan 2025, 2:20 pm
केज : आम्ही पोलीस असून तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे म्हणून महिलेला दागिने काढण्यास सांगून हातचलाखी करून १ लाख २० हजार रु. किमतीचे मिनी गंठण व कानातील झुंबर हे दागिने घेवून पोबारा केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास रामकंवर उर्फ अनिता शंकर राऊत वय ५० वर्ष ही महीला केज-कळंब रोड लगत असलेल्या साई नगर येथील धुणी-भांड्याचे काम आटोपून विठाई पुरमकडे जात असताना लोहीया यांचे हार्डवेअरच्या दुकानाच्या बाजुने जात असताना समोर एक व्यक्ती ऊभा होता. त्याच वेळी अचानक पाठी मागुन मोटार सायकलवरून एक व्यक्ती आला. त्याने डोक्याला हेल्मेट घातले होते. त्याने रामकंवर उर्फ अनिता हिच्या जवळ गाडी ऊभी करून म्हणाला की, " शितल शिंदे यांचे घर कोठे आहे ? त्यांची पेपर मध्ये बातमी आलेली आहे. मी पोलीस आहे." असे म्हणुन खाकी ड्रेस असलेले ओळखपत्र दाखवले.
त्या नंतर तो म्हणाला की, "तुम्ही तुमच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागीने काढुन बॅगमध्ये ठेवा. बायकांनी असे दागिने घालुन फिरायचे नसते. आमचे साहेब भेट दयायला येत आहेत." असे म्हणाल्याने त्या महिलेने कानातील झुंबर काढून पर्स मध्ये ठेवले. त्यानंतर त्याने गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण काढण्यास सांगितले. ते लवकर न निघल्याने त्याने गळ्यातील मिनीगंठण काढुन पर्समध्ये काढून टाकल्या सारखे केले. रामकंवर उर्फ अनिता शंकर राऊत यांनी पर्स चेक केली असता त्यानध्ये बनावट गंठण दिसले. त्यामुळे रामकंवर उर्फ अनिता यांनी त्याची मोटार सायकल धरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे अनोळखी व्यक्ती त्यांची मोटार सायकल क्र. २८२९ यावर बसुन केजच्या दिशेने निघुन गेले.
रामकंवर उर्फ अनिता राऊत यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गु. र. नं. ३३/२०२५ भा. न्या. सं. २०४, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.