प्रकाशात आज भरणार कार्तिकी स्वामींची यात्रा:कार्तिक पाैर्णिमेनिमित्त हाेताे वर्षातून एकदाच स्वामींच्या दर्शनाचा लाभ‎

6 days ago 2
वर्षातून एकच दिवस भाविकांना दर्शनासाठी उघडणाऱ्या येथील कार्तिक स्वामी मंदिराचा यात्रोत्सव कार्तिक पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी (दि. १५) भरणार आहे. या एकाच दिवशी दर्शनासाठी मंदीर उघडले जाणार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होईल. त्यासाठी यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. कार्तिक स्वामी नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने खडी साखर, शेंगदाण्यांचा नैवेद्य व मोरपीस कार्तिकी स्वामींना अर्पण केले जाते. वर्षातून एकदाच कार्तिकी स्वामींचे मंदीर उघडत असल्याने दरवर्षी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी विधिवत पूजनानंतर कार्तिकी स्वामींच्या मंदिराचे द्वार उघडण्यात येईल. या दिवशी यात्रा भरणार असून तत्पूर्वी पादुका, मातृका पूजनासह गणेश स्थापना होईल. होम हवन पूजेचे मानकरी प्रवीण प्रभु माळीच व अनुसया माळीच हे दांपत्य असून त्यांच्या हस्ते पूजन होईल. १६ रोजी उत्तर रात्री २ वाजून ५८ मिनिटांनी मंदिराचे द्वार भाविकांना दर्शनासाठी खुले राहील. यावर्षी दर्शनासाठी तब्बल २० तासांचा अवधी उपलब्ध असणार आहे. कार्तिक स्वामी भक्त गण परिवारातर्फे मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, महिला व पुरुष भाविकांच्या स्वतंत्र व्यवस्था केली. भाविकांची प्रगाढ श्रद्धा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा (ता.शहादा) येथे शेकडो शिवालयांसह विविध देवदेवतांची मंदिरे आहेत. गावाच्या दक्षिणेला तापी नदी काठावर त्यापैकी कार्तिक स्वामींचे एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाचे शिवलिंग, सोबतच डावीकडे गणपती तर उजव्या बाजूला कार्तिक स्वामी एकाच मूर्तीत दोन आकर्षक छबी आहेत. या मंदिराच्या परिसरात मनीषापुरी माता, खंडेराव महाराज, दक्षिणमुखी मारूती, सिद्धिविनायक, शनिदेव, ऋणमुक्तेश्वर, धृतपापेश्वर, चिंतामणी महादेव या देवतांची मंदिरे आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article