प्रयागराजमध्ये वसंत पंचमीचे तिसरे अमृत स्नान होणार उद्या; स्नानासाठी भाविकांचा अखंड ओघFile Photo
Published on
:
02 Feb 2025, 7:32 am
Updated on
:
02 Feb 2025, 7:32 am
प्रयागराज : पुढारी ऑनलाईन
महाकुंभाच्या दरम्यान वसंत पंचमीच्या दिवशी विशेष अमृत स्नानाचे आयोजन ३ फेब्रुवारीच्या ब्रह्म मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या दिवशी पवित्र स्नानाची वेळ सकाळी ५ : २३ ते ०६ : १६ वाजेपर्यंत आहे. (vasant panchami)
Mahakumbh 2025 3rd Amrit Snan: प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून रोज कोटीच्या संख्येने भाविक येत आहेत. या ठिकाणी त्रिवेणी संगमात कोट्यावधी लोकांकडून आस्थेची डुबकी लावत आहेत. महाकुंभात पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झाले. तर दुसरे अमृत स्नान मौनी अमावस्येदिवशी पार पडले. तर आता पुढचे तीसरे अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी होणार आहे.
वसंत पंचमीचे अमृत स्नान सोमवारी आहे. सोमवारी पुन्हा एकदा आस्थेचा वसंत पंचमी अमृत स्नान सोमवार आहे. सोमवारी पुन्हा एकदा भाविकांचा मोठ्या संख्येने जनसमुह अवतरण्याची अपेक्षा आहे. काली मार्ग, धरण आणि संगमकडे जाणाऱ्या रस्त्यांसह मेळा परिसरातील मुख्य रस्त्यांवर दुपारपासूनच आंघोळीसाठी येणाऱ्या लोकांच्या रांगा लांब होऊ लागल्या आणि रात्री उशिरापर्यंत लोक येत राहिले.
दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा रविवारी आस्थेची गर्दी उमलणार आहे. वसंत पंचमी अमृत स्नान पर्वात सोमवारी चार कोटी लोक स्नान करण्याचा अंदाज बांधला जात आहे. शनिवारी सायंकाळपासूनच याची झलक पाहायला मिळत आहे. संगमाला येणाऱ्या मार्गांवर स्नानार्थिंची रांग लागल्याचे दिसून येत आहे. याची प्रशासनालाही माहिती आहे, त्यामुळे होणाऱ्या उच्चांकी गर्दीला अनुसरून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.
२६ जानेवारीपासूनच मेळ्यात येण्यासाठी भाविकांची गर्दी सुरू झाली होती. मौनी अमावस्येदिवशी गर्दीचे सर्व रेकॉर्ड तुटले. या दिवशी जवळपास आठ कोटीहून अधिक लोकांनी स्नान केले. त्या तुलनेत शुक्रवार आणि शनिवार भाविकांची गर्दी कमी होती.
वसंत पंचमीचे स्नान सोमवारी आहे. मात्र रविवारीच पंचमी लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज रविवार सकाळपासूनच वसंत पचमीचे स्नान सुरू झाले आहे. त्यामुळे रविवार आणि सोमवारी पुन्हा एकदा आस्थेची डुबकी घेण्यासाठी पुन्हा एकदा भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. काली मार्ग, बांध सह मेळा क्षेत्रातील प्रमुख मार्गांवर तसेच संगमात येण्या जाणाऱ्या मार्गांवर सकाळपासूनच भाविकांची गर्दीची रांग वाढू लागली आहे. रात्रीपासून भाविकांचा अखंड ओघ सुरू आहे.
शनिवारी दोन कोटी लोकांनी केले स्नान
शनिवारी जवळपास दोन कोटी भाविकांनी प्रयागराजच्या पवित्र संगमात स्नानाची पर्वणी साधली. मेळा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, सकाळी ४ वाजेपर्यंत १.८० कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले होते.
वसंत पंचमीसाठी संगम घाटावर २८ मोक्याची ठिकाणे
वसंत पंचमीच्या अमृत स्नानाच्या पर्वात भाविकांना सुरक्षित स्नान करण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार संगम तटावर २८ मोक्याची ठिकाणे बनविण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलिसांसोबतच आरएएफ आणि पॅरामिलेट्रीचे जवान यांची संयुक्त टीम घटनास्थळी तैनात असेल. मौनी अमावस्येदिवशी झालेल्या दुर्घटणेला लक्षात घेउन हा निर्णय घेण्यात आला आहे. ही २८ ठिकाणे अशा ठिकाणी बनवण्यात आली आहेत, ज्या ठिकाणी भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने संवेदनशील आहेत.