Published on
:
30 Nov 2024, 2:25 am
Updated on
:
30 Nov 2024, 2:25 am
वेंगुर्ले : मुंबई-कांदिवली येथील रहिवासी महेंद्र हेमकांत वेंगुर्लेकर (47) यांची प्रवासी तिकीट बुक करण्यातून अज्ञाताने 72,416 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याबाबत महेंद्र वेंगुर्लेकर यांनी 29 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही फसवणूक 14 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10 वा. झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महेंद्र वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्ले येथून मुंबईला जाण्यासाठी प्रवासी तिकीट बुक करण्यासाठी गुगलवरून सर्च केले असता, अज्ञात व्यक्तीने लिंक पाठवून त्यावर मोबाईल स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. त्यानंतर क्रेडिट कार्डद्वारे एकूण 72,416 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. तसेच कॉल करून शिवीगाळ केली, अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात बीएनएस 318 (4), 352, 351(2) व माहिती तंत्रज्ञान 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक संदीप भोसले करीत आहेत.