प्रशिक्षणातून बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राने घडवले ५६० उद्योजक:कृषी उद्योगांसह शेती प्रक्रिया आणि शेतीपूरक व्यवसायाला मिळते चालना‎

4 hours ago 1
पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेती क्षेत्रातील पदवीधरांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाले, तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रात होऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात अंतर्गत कृषी मंत्रालय भारत सरकार, मॅनेज हैदराबाद आणि नाबार्ड पुणे यांच्या माध्यमातून ॲग्री क्लिनिक्स आणि ॲग्री बिझनेस या कोर्सच्या माध्यमातून ३३ बॅचमधून एकूण ९२४ कृषी पदवीधरांना प्रशिक्षण देऊन याद्वारे ५६० प्रशिक्षणांर्थीनी कृषी उद्योजक आणि पूरक व्यवसाय सुरू केले आहेत. कृषी शिक्षणातील बी.एस्सी (कृषी), हॉर्टीकल्चर, कृषी अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, मत्स्यव्यवसाय किंवा फॉरेस्ट्री या क्षेत्रातील पदवी किंवा पदवीकाधारकांना मॅनेज हैदराबाद, नाबार्ड, पुणे आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय पुरस्कृत ॲग्री क्लिनिक्स ॲग्री बिझनेस या कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थीची राहणे, जेवण व्यवस्था मोफत आहे. कोर्स विनामुल्य आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुकांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कमीतकमी एक वर्ष झाले असले पाहिजे. या अटीवर प्रवेश दिला जातो. कोर्स पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना राष्ट्रीयकृत बँकाकडून २० लाख रुपयांपर्यंत व्यवसायासाठी अर्थसाहाय्य केले जाते. व्यवसायासाठी खुल्या वर्गातील उमेदवारासाठी ३६ टक्के, तर महिला आणि अनूसूचित जाती जमातीतील उमेदवारांसाठी ४४ टक्के अनुदान उपलब्ध आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात व्यवसाय निवड, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, मार्केटींग, प्रकल्प आराखडा तयार करणे, अभ्यासदौरा यासारख्या व्यवस्थापकीय आणि तांत्रिक विषयांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, जि. प. च्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दादासाहेब खोगरे, शांताराम सोनवणे, भरत दवंगे, डॉ. विलास घुले, प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे, डॉ. विठ्ठल विखे, कैलास लोंढे यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र राज्यात प्रगती पथावर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कृषी उद्योजकाच्या माध्यमातून शेती क्षेत्राला नवी चालना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राने दिली. अनेक युवतींनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय, अनेक कृषी पदवीधरकांनी कंपन्या, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती व विविध पिकाचे सल्लागार म्हणून शेती क्षेत्राला चालना देण्याचे काम केले. या प्रशिक्षणामुळे नोकरी सोडून प्रशांत पुलाटे आणि संजय राऊत यांनी गांडूळ खत प्रकल्पातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणातून स्वत:चा व्यवसाय सुरू केला शेती उद्योगासाठीच्या प्रशिक्षणातून मोठी चालना मिळाली. यातून मी केलवड गावात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला मी जनसेवा फाउंडेशन अंतर्गत बचत गटाची जोड देऊन अनेक महिलांना रोजगार दिला. यातून डाळ मिल, पशुखाद्य निर्मिती आणि भाजीपाला प्रक्रिया यावर काम करत आहे. यातून मी स्वयंपूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया केलवड येथील मनीषा गमे यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article