Nawab Malik connected Devendra Fadnavis : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणूक अन् लोकभावना यावर नवाब मलिक काय म्हणाले? वाचा सविस्तर...
देवेंद्र फडणवीस, नवाब मलिकImage Credit source: Facebook
देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा नबाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही मागणारही नाही. मागणारा नवाब नाही, आम्ही देणारे आहोत. पण नाही देवेंद्रजीला बोलत असताना माझ्या बाबतीत त्यांच्या काय असतील. नबाब मलिक कोणाला घाबरत नाही. आता आम्ही बोलायला सुरुवात केली तर कोर्टात जाताय की यांची जामीन रद्द करा. मला तुरुंगात टाका. आणखीन मला दहा- वीस हजार मत वाढतीलय माझ्या बाबतीत जे गैरसमज निर्माण करतात. दाऊदशी माझं नाव जोडतात. काही लोक आतंकवादी बोलतोय काही लोक देशद्रोही बोलतायेत. या सगळ्यांच्या विरोधात मी तपासून नोटीस पाठवणार आहे. सगळ्यांवर क्रिमिनल केस टाकणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.