फॅबेक्स 2025 मध्ये 150 बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार:पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन
2 hours ago
1
व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या फेबर इंफायनाइट कन्सल्टींगतर्फे ‘फॅबेक्स 2025 या आगळ्यावेगळ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शुक्रवार दिनांक 7 फेब्रवारी 2025 रोजी, ओ हॉटेल, पुणे येथे करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती फेबर इंफायनाइट कन्सल्टींगचे संचालक विशाल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘फॅबेक्स 2025’ या आगळ्यावेगळ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 7 फेब्रवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी कायनेको ग्रुपचे कार्यकारी संचालक शेखर सरदेसाई आणि एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मकरंद अपल्वार हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्त जागतिक दर्जाचे उद्योगपती आणि व्यवस्थापकांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये अदानी ग्रुप, टाटा ग्रुप, ऍमनीयल फार्मास्युटिकल्स यासह देशातील सुमारे 150 बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन क्षेत्रावर होणारे परिणाम लक्षात घेऊन ऑपरेशनल एक्सलन्स, इंडस्ट्री 4.0 आणि एन्व्हार्यन्मेन्टल, सोशल अँड गव्हर्नन्स प्रॅक्टीसेस या संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ‘फॅबेक्स 2025’ या राष्ट्रीय परिषदेची आखणी करण्यात आली आहे. यानिमित्त ‘फ्युचर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्सः इंटरसेक्शन ऑफ इंडस्ट्री 4.0 अँड ऑपरेशनल एक्सलन्स’ याविषयावर होणाऱ्या चर्चासत्रात टायटन कंपनीचे ऑपरेशनल एक्सलन्स प्रमुख चंद्रशेखर बापट, भारत फोर्ज लिमिटेडचे वरिष्ठ सहाय्यक उपाध्यक्ष राहुल लाळे, गेस्टामॅपचे प्लान्ट संचालक निंबा पाटील सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. तर यानंतर ‘ऑपरेशनल एक्सलन्स इन द ईएसजी वर्ल्डः मर्जिंग परफॉर्मन्स विथ पर्पज’ या विषयावर होणाऱ्य चर्चासत्रात टफरोप्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक डॉ. नवनाथ तरले, जे.आर. ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटरमण, ऍमनीयल फार्मास्युटिकल्स वरिष्ठ उपाध्यक्ष नरेश गौर सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. डिजिटल परिवर्तन आणि शाश्वततेच्या शोधासाठी नवीन पिढीला आवश्यक ज्ञान आणि साधनांनी सुसज्ज करण्याच्या उद्देशाने फॅबेक्स 2025 ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये तंत्रज्ञानातील प्रगती, शाश्वत जीवन पद्धती आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेवर प्रकाश टाकण्यात येणार असून उद्योगांच्या वेगाने बदलणाऱ्या कार्यपध्दतीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शाश्वत विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेली ही राष्ट्रीय परिषद स्वावलंबन, नाविन्यपूर्ण व्यवसाय पद्धती आणि पर्यावरणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)