Devendra Fadnavis Interview: समाजाला वाटण्याचे काम काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केले आहे. त्यामुळे ही निवडणूक एक युद्धच आहे. भारताचा इतिहास पाहिल्यास जेव्हा, जेव्हा देश जाती आणि प्रांतात वाटला गेला तेव्हा, तेव्हा देशाचे तुकडे झाले, देशातील लोक कापले गेले. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास राहिला आहे. त्याचीच आठवण ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेतून योगी आदित्यनाथ यांनी करुन दिली. या घोषणेत काहीच चुकीचे नाही, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पंकजा मुंडे, अजित पवार यांच्या विरोधावर…
योगीजी यांच्या या वक्तव्यावर तुमच्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले या घोषणेला जागा नाही. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे लोक जनतेचे सेंटेमेंट समजू शकले नाही. या घोषणेचा अर्थ समजू शकले नाही किंवा बोलताना त्यांना वेगळे काही सांगायचे आहे आणि ते वेगळे काही सांगून गेले. अजित पवार यांचा विचार केला तर ते आतापर्यंत हिंदू विरोधी असलेल्या विचारात राहिले.
त्यांची धर्मनिरपक्षेतेची व्याख्या हिंदू विरोधला म्हणजे धर्मनिरपक्षेता होती. त्यांना जनतेचे कल समजून घेण्यास थोडा वेळ लागणार आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे आहे. त्यात काहीच चुकीचे नाही, असे आपणास वाटते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
हे सुद्धा वाचा
‘एक है तो सेफ’ हा महामंत्र
‘एक है तो सेफ’ हा मोदींचा महामंत्र म्हटले, कारण काँग्रेस आणि महाविकास आघाडी समाजाला वाटत आहे. त्यांचा भारत जोडो त्यांच्या हातातील लाल संविधानप्रमाणे आहे. त्या लाल संविधानमध्ये वरती कव्हर होते, आता कोरे कागज होते. ते सर्व माध्यमांनी दाखवले. त्यानंतर त्यांनीही हे मान्यही केले. आम्ही असेच जाती-जातीत वाटले गेलो होतो. त्यांचा भारत जोडो नाव असेच आहे, त्यांचे भारत जोडो सर्व संघटना तोडणे, असे आहे.