बाबा लगीन… ढिंगच्यॅक ढिंगच्यॅक, नोव्हेंबरमधील विवाहासाठी आतापासूनच हॉटेल; मंगल कार्यालये बुक

2 hours ago 1

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने लग्नाचा बार उडणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर लग्नासाठी सर्वात शुभ तारखा आहेत. या दिवसांमध्ये देशभरातील सर्व हॉटेल्स आणि मंगल कार्यालये बुक झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाशी संबंधित सपोर्ट सेवादेखील बुक आहेत. मुंबईतील ताजमहाल पॅलेसमध्ये या तारखांना सर्व बँक्वेट हॉल बुक झाले आहेत. एका रात्रीसाठी 33 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खोल्या वगळता इतर खोल्याही आधीच बुक करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील ग्रँड हयात आणि जेडब्ल्यू मॅरियटमध्येही हीच स्थिती आहे, अशी माहितीही समोर आली आहे. नोव्हेंबरमधील लग्नासाठीच्या शुभ तारखा हॉटेल आधीच बुक झाल्या आहेत. अशा शुभ तारखांसाठी खोल्यांचे दर साधारणपणे 20 ते 30 टक्के जास्त आकारले जात आहेत.

वेडिंगसाठी आवडत्या ठिकाणांपैकी उदयपूर आणि जयपूरमध्येही लक्झरी हॉटेल्स बुक झाली आहेत. सन 2023 व 2022 च्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये शुभ तारखांना लग्नाची मागणी जास्त असून 24 नोव्हेंबरला सर्वाधिक मागणी आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article