राज्यात विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घ्या:बहुतांश पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी; पोलिस महासंचालक शुक्ला यांना हटवा - काँग्रेस

2 hours ago 2
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घ्या, अशी एकमुखी मागणी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केली. महागाई वाढल्याने निवडणूक खर्च मर्यादा २० लाखांनी वाढवावी, अशी मागणी शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. तर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाच्या १४ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ तीनदिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहे. शुक्रवारी त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. शनिवारी अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन अधिकारी पत्रकार परिषद घेतील. पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, निवडणुका नि:पक्षपाती होण्यासाठी सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलिस ​​​​​​​महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्यामुळे निवडणूक काळात त्यांना या पदावर ठेवू नये, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली आहे. रेसिडेन्शियल सोसायटीत मतदान केंद्र उभारण्याच्या निर्णयालाही काँग्रेसने विरोध केला. भाजपच्या वतीने आमदार आशिष शेलार चर्चेला गेले होते. ते म्हणाले,‘मतदान केंद्रावर शेड, पंखे, पिण्याच्या पाण्याची सुविधा हवी. सलग सुट्यांदरम्यान मतदान ठेवू नये. १५०० मतदारांमागे एक बूथ अशी रचना असते त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी होते. त्यामुळे कमी मतदार संख्येचे एक बूथ करावे.​​​​​​​ बदल्यांना टाळाटाळ; मुख्य सचिव, महासंचालकांना नोटीस प्रशासन आयोगाच्या सूचनांचे पालन करत नसल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभेपूर्वी १०० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना आयुक्तांनी स्पष्टीकरण कागितले. गृहजिल्ह्यांमध्ये ३ वर्षांहून अधिक काळ तैनात अधिकाऱ्यांच्या ३१ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण बदल्या करण्यात आल्या नाहीत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article