भाजपचे माजी खा.संजय पाटील यांची माजी नगराध्यक्षाला मारहाण:कवठेमहांकाळ नगराध्यक्षपद निवडणुकीपूर्वी राडा

2 hours ago 1
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला वातावरणनिर्मिती करत असल्याच्या कारणावरून भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी मुल्ला यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या आईला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेनंतर तासगाव तालुक्यात आर. आर. पाटील विरुद्ध संजय पाटील या दोन गटातील हा जुना संघर्ष उफाळून आला आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कवठेमहांकाळ येथे नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरुद्ध शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होत आहे. या मतदारसंघात संजय पाटील विरुद्ध माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे. शुक्रवारी अय्याज यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि त्यांचे चिरंजीव रोहित यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी बोलताना रोहित पाटील यांनी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांची गुंडगिरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असे सांगितले. संजय पाटील यांच्याकडून माफियाराज : रोहित पाटील संजय पाटील यांच्या स्वत:च्या तासगाव मतदारसंघात लोकसभेला मताधिक्य घटले आहे. त्यामुळे ते या तालुक्यात माफिया परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप रोहित पाटील यांनी केला. कानशिलात लगावली, बेदम मारहाण नाही : संजय पाटील संजय पाटील म्हणाले, रोहित पाटील यांच्या काही समर्थकांनी माझ्या स्वीय सहायकाला मारहाण केली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी अय्याज यांच्या घरी गेलाे असता झालेल्या वादात आपण अय्याज यांच्या कानशिलात लगावली. मात्र, बेदम मारहाण केली नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article