विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करत खूनpudhari
Published on
:
30 Sep 2024, 7:01 am
Updated on
:
30 Sep 2024, 7:01 am
शहरातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला. अथर्व पोळ (वय 18) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सोमवारी (दि. 30)रोजी दुपारी ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार तिघांनी अथर्व याच्यावर वार केले. एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघे फरार झाले आहेत. 15 दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचे पर्यावसन थेट खुनात झाल्याचे समोर येत आहे.