बालविवाहाच्या दुष्परिणामाची विद्यार्थ्यांमध्ये जागृती:बालविवाह मुक्त अभियान राबवून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात महात्मा फुले स्मृतीदिन साजरा
1 hour ago
1
निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व साई श्रध्दा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांचा १३४ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बालविवाह मुक्त भारत मोहिमेतंर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना अल्पवयीन वयात होणाऱ्या लग्नाचे दुष्परिणाम सांगून, बालविवाह प्रतिबंधक शपथ देण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, बाळासाहेब कोतकर, प्रमोद थिटे, अमोल वाबळे, तेजस केदारी, मयुरी जाधव, भानुदास लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाना डोंगरे म्हणाले, शिक्षणाचा पाया रोवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला सुसंस्कारी केले. महिलांपासून शिक्षणाची सुरुवात करून, त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत क्रांती घडविली. पालकांनी मुलींच्या लग्नाची घाई न करता त्यांना शिक्षणाने आपले भवितव्य घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या उपक्रमासाठी एन. बी. कराळे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, संकल्प शुक्ला, अशोक गाडेकर, सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. मुला-मुलींचे भविष्य बालविवाहामुळे धोक्यात बालविवाहामुळे मुला-मुलींचे भविष्य धोक्यात येते. आपले भवितव्य घडवण्याच्या वयात त्यांच्यावर जबाबदाऱ्या येतात. मुलींना लहान वयात आई होणे जीवावर बेतते. यासाठी पालकांनी जागृक राहून मुलीच्या वयाच्या १८ वर्षानंतर लग्न करावे. तर आपल्या मैत्रीणींचे कमी वयात लग्न होत असल्यास उडान प्रकल्पाला माहिती देण्याचे आवाहन मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)