बीडमध्ये आणखी एका सरपंचाकडे खंडणीची मागणी:नाही दिल्यास दिली जीवे मारण्याची धमकी, महिलेने दिला आत्मदहनाचा इशारा

7 hours ago 1
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथील एका महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावाच्या माजी सरपंचाने एक लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. सरपंच मंगल राम मामडगे यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरपंच मंगल राम मामडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुण माजी सरपंच, एक सदस्य तसेच उपसरपंचाचा पती या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच मंगल राम मामडगे यांच्या तक्रारीनुसार, आरोपी विविध कारणे सांगत विकासकामांमध्ये अडथळे सातत्याने आणत होते, खोट्या तक्रारी सुद्धा दाखल करत होते. दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली होती. अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला सरपंच मंगल मामडगे यांनी दिला आत्मदहनाचा इशारा या प्रकरणानंतर आता महिला सरपंच मंगल मामडगे यांनी आत्मदहनाचा इशारा देखील दिला आहे. त्या म्हणाल्या, आम्हाला कुठलेच काम करू दिले जात नाही. माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख, ज्ञानोबा देशमुख हे सातत्याने आमच्याकडे खंडणी मागतात. पैसे दिले तर तुला काम करू देणार, नाहीतर काम करू देणार नाही, अशी धमकी देतात. 11 जानेवारीला माझ्या मुलाला सायंकाळी पाच वाजता यांनी घरी बोलवून घेतले, त्याला दम दिला. तुझ्या आईला सांग, अर्धवट कामांवर सह्या करा, नाहीतर तुझ्या आईला जेलमध्ये घालू असे धमकवले. आम्हाला सह्या दिल्या नाही तर तुमच्या घराची इज्जत घालवू, तुझी आई कशी जगते ते बघू, असे म्हटले. माझ्या मुलाने घरी येऊन मला सांगितले की, तू राजीनामा देऊन टाक. आपल्या घराला धोका आहे. मी त्याला विचारले काय झाले तर तो बोलला माजी सरपंचाने मला घरी बोलावून धमकावले, अशी माहिती मंगल मामडगे यांनी दली आहे. पुढे मंगल मामडगे म्हणाल्या, शाळेच्या कामासाठी चार लाखांचा निधी आला आहे, त्यातील एक लाख रुपये द्या, अशी खंडणी माजी सरपंचाने मागितली आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत न्याय द्या, नाहीतर आम्ही आत्मदहन करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच माझ्या मुलाने यांना कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोपही मंगल मामडगे यांनी केला आहे. यावर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article