बुबळीचे वैद्यकीय अधिकारी राऊत गैरहजर:सेवा समाप्तीची कारवाई, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्राला अचानक भेट
3 hours ago
1
लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य केंद्र कमीच तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय असून आठ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर ३९ उपकेंद्र आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत या आरोग्य केंद्राची संख्या कमीच आहे. त्यातही आरोग्य कर्मचारी गैरहजर असतात. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात जावे लागते. तालुक्यात आणखी आरोग्य केंद्रांची आवश्यकता आहे. प्रतिनिधी | बोरगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यातील बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप राऊत हे अनधिकृत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांच्यावर सेवा समाप्ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना देण्यात आहेत. सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागात काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहतात. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या नेहमी तक्रारी होतात. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी (दि. २९) सुरगाणा तालुक्यात अचानक भेट दिली. यात प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सुचना न देता गैरहजर असल्याचे आढळून आल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत. बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधीसाठ्याची त्यांनी चौकशी केली. त्याचबरोबर औषधी साठ्याची माहिती घेत रुग्णांशी चर्चा केली. या दौऱ्यात ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी महेश पोतदार यांच्यासह तालुकास्तरीय विभागप्रमुख व ग्रामपंचायत अधिकारी सहभागी होते. राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा १०० % विनियोग करावा, गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज आढावा घेऊन घरकुल योजनेचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी व पंचायत समिती सुरगाणा येथे अचानक भेटी दिल्या.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)