सेलिब्रिटी किड्सना बॉलिवूडमध्ये सहज एन्ट्री मिळते. पण अभिनयाच्या जोरावर त्यांच्या करीयर ठरतं. अनेक सेलिब्रिटी कड्सने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पण आई-वडीलांप्रमाणे त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. यामध्ये दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची लहान मुलगी रिंकी खन्ना देखील आहे. रिंकी खन्ना ही बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची लेक आहे.
रिंकी हिचा बॉलिवूडमधील प्रवास आई – वडिलांप्रमाणे फार लहान होता. काही सिनेमांमध्ये भूमिका बजावल्यानंतर रिंकी लाईमलाईटपासून दूर झाली. अभिनयाला रामराम ठोकल्यानंतर देखील रिंकी कधीच चर्चेत आली नाही. फार कमी रिंकी आता भारतात येते… अशी माहिती देखील समोर येत आहे.
रिंकी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 1999 मध्ये रिंकीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री 2004 नंतर गायब झाली. रिंकीच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘प्याक में कभी-कभी’ असं होतं. तर तिच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘चमेली हेतं.’ पण रिंकीचा कोणताच सिनेमा मोठ्या पडद्यावर हीट ठरला नाही.
हे सुद्धा वाचा
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस देश में गंगा रहता हैं’ सिनेमात रिंकी झळकली होती. तर सिनेमा अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे मुख्य भूमिकेत होती. रिंकी हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील काम केलं आहे. पण रिंकीला यश मिळालं नाही.
आता कुठे असते रिंकी खन्ना?
रिंकी खन्ना हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, रिंकीने 2003 मध्ये उद्योजक समीर सरन यांच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. मीडिया रिपोर्टनुसार, रिंकी खन्ना आता पती आणि मुलगी नाओमिका यांच्यासोबत लंडन येथे राहते. रिंकी हिला एक मुलगा देखील आहे.
रिंकी खन्ना लाईमलाईट आणि सोशल मीडियापासून दूर असते. फक्त विशेष प्रसंगी रिंकी आई डिंपल कपाडिया आणि बहीण ट्विंकल खन्ना यांच्यासोबत दिसते. रिंकी काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
रिंकी आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, तिची लेक नाओमिका कायम चर्चेत असते. नाओमिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नाओमिका अद्याप अभिनेत्री नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.