बोदवड तालुक्यात समाधानकारक पावसामुळे रब्बीतील 45 टक्के पेरण्या पूर्ण:मका, हरभऱ्याच्या लागवडीवर भर
2 hours ago
1
नेहमी अवर्षण प्रवण असणारा बोदवड तालुका यंदा पाण्याच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे, बोदवड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांसाठी होणार आहे. आतापर्यंत रब्बी हंगामाचे ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. ६७०७ हेक्टर लागवड योग्य क्षेत्रापैकी २९९७ हेक्टरवर रब्बी हंगामाचे पीक पेरले गेले आहे. रब्बी हंगामातील शेती कामांना वेग देखील आला आहे. मका हरभरा पिकांच्या पेरणी सुरुवात झाली आहे, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली. बोदवड तालुक्यात रब्बी हंगामाचे एकूण ६७०७ हेक्टर लागवड योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी सर्वसाधारण क्षेत्रात २९९७ हेक्टरवर रब्बी हंगामाचे पीक पेरले गेले आहे. अजून थंडी वाढताच गहू आणि हरभरा यांच्या पिकांमध्ये लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोदवड तालुक्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी हरभरा मका पिकांच्या पेरण्या सुरू केल्या असून पेरणी झालेल्या पिकांना पाणी देऊन उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत असल्याचे कृषी विभागाचे महाजन यांनी सांगितले. यंदाच्या रब्बी हंगामातील स्थिती {ज्वारीसाठी ११५ हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी ४२ हेक्टर अर्थात ३६.४० टक्के पेरणी झाली आहे. {मक्यासाठी १७६५.९५ हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी ४३२ हेक्टर अर्थात २५ टक्के मक्याची लागवड झाली. {गव्हासाठी १७२१ हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी ५४३ हेक्टर अर्थात ३२ टक्के लागवड झाली आहे. {हरभऱ्यासाठी क्षेत्र ३०९५ हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी १९८० हेक्टर अर्थात ६४ टक्के हरभरा पेरणी झाली. थंडी पडताच पेरण्या वाढतील ^गहू पिकासाठी अजून पोषक वातावरण नसल्याने काही पेरण्या सुरू झालेल्या नाही. येत्या महिन्यात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे, थंडी पडताच गहू व हरभऱ्याच्या लागवडीत वाढ होईल. -भाऊसाहेब वाळके, तालुका कृषी अधिकारी, बोदवड
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)