भाजपचा निवडणुकीतील खेळ खल्लास:BJP चा खरा चेहरा उघड, खासदार संजय राऊत यांचा विनोद तावडे प्रकरणावर घणाघात
2 days ago
1
मुंबई
विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. आता या निवडणुकीतील भाजपचा खेळ खल्लास झाला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर आता राजकीय पक्षांनी मतदारांच्या गुप्त भेटीगाठी व बैठकांवर जोर दिला आहे. त्यातच बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. संजय राऊत म्हणाले, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडले, ते कॅमेऱ्यापुढे आहे. या प्रकरणी खुलासे कशाचे होत आहेत? भाजपचा खरा चेहरा उघड झाला. त्यांचा या निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस यांच्याकडे तब्बल 5 कोटी रुपये सापडलेत. बहजुन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे जप्त केलेत. पैसे तोंडावर फेकले तोंडावर व गोंधळ घालून विनोद तावडे यांना तिथे कोंडून ठेवले. यावर कोणता खुलासा करणार हे भाजपने सांगावे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता लागण्यापूर्वी किमान 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले. आता आज नाशिकमध्ये भाजप व शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईत पैसे वाटण्यासाठी ठाण्यातून खास माणसे नियुक्त करण्यात आली आहेत. ठाण्याच्या बाजूला ईशान्य मुंबई आहे. तिथे शिंदे यांचे राम रेपाळे यांचा माणूस आहे. हा माणूस रात्रीच्या अंधारात पैसे घेऊन येतो व मतदारांना पैसे वाटतो. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ठाण्याला परत जातो. या प्रकरणी राम रेपाळे हे नाव सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)