भाजपची पहिली यादी आज, शिंदेसेना-अजितदादा गटाला 138 जागांतच गुंडाळणार:भाजपच्या पहिल्या 50 जणांच्या यादीत आमदारांची नावे, काही नवे चेहरेही

2 hours ago 1
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यात भाजपने सर्वात आधी बाजी मारली आहे. केंद्रीय समितीने दिल्लीच्या बैठकीत ११० नावे निश्चित केली आहेत. त्यापैकी ५० ते ६० नावांची पहिली यादी शुक्रवारी दिल्लीतून जाहीर होईल. यात बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश असेल. काही मतदारसंघात चेहरे बदलून धक्केही दिले जातील. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. १५० पेक्षा एकही जागा कमी लढवणार नाही, या भूमिकेवर भाजप ठाम आहे. त्यामुळे उर्वरित १३८ जागा शिंदेसेना व अजित पवार गटांमध्ये वाटून दिल्या जातील. शिंदे गटाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक ठेवली आहे. त्यात त्यांचा अंतिम निर्णय होईल, तर शुक्रवारी किंवा शनिवारी अजितदादा गटही आपला अंतिम निर्णय जाहीर करतील. त्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला जाहीर होईल. काँग्रेसची पहिली यादी रविवारी; उद्धव यांचे १५ जणांना एबी फॉर्म काँग्रेस नेत्यांची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर गुरुवारी महाविकास आघाडीतील नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्यात २६० जागांवर एकमत करण्यात यश आले. आता उर्वरित २८ जागांबाबत मतभेद आहेत. यातील बहुतांश जागा विदर्भ व मुंबईतील आहेत. या २८ जागांवर उद्धवसेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच अाहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस व उद्धवसेनेने १०० हून अधिक जागांचा दावा सोडला आहे. आता काँग्रेस ९५, सेना ९० व शरद पवार गट ७५ जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले. दरम्यान, काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरला जाहीर होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर उद्धवसेना मुखपत्रातून २१ तारखेला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल. नव्या सर्व्हेतही ८५ जागांवरच विजयाचा भाजपकडून निष्कर्ष दिल्लीतील बैठकीनंतर गुरुवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात नेत्यंाच्या गोपनीय बैठकांचे सत्र सुरू होते. कफ परेड भागात भाजपचे नवे कार्यालय सुरू झाले आहे. तिथे सकाळपासूनच प्रवक्त्यांना प्रशिक्षण देणे सुरू होते. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेतही भाजपला ५५ ते ६० जागांवरच यश मिळेल, असा अंतर्गत सर्व्हेचा अहवाल होता. त्यामुळे भाजपने मरगळलेली यंत्रणा, कार्यकर्त्यांना झपाटून कामाला लावले. पुढचा मुख्यमंत्री आपलाच आहे, असा विश्वास त्यांना दिला. हरियाणातील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. तरीही आमदारांची संख्या ८५ पर्यंतच वाढेल, असा निष्कर्ष नव्या सर्वेक्षणात आहे. त्यामुळे पक्षात चिंतेचे वातावरण आहे. उद्धवसेनेचे निष्ठावंतांना कामाला लागण्याचे आदेश शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाकरेंकडे १५ आमदार राहिले. त्यांना गुुरुवारी उद्धव ठाकरेंनी एबी फाॅर्म वाटप केले. यादीची वाट न पाहता २३ तारखेपासूनच अर्ज भरा, असे त्यांना सांगण्यात अाले. मातोश्रीवरील बैठकीत हा निर्णय झाला. शरद पवार गट }आयात उमेदवारांवरच असेल भर महायुतीतील विशेषत: अजित पवार गटातील नाराजांना हेरून उमेदवारी देण्यावर शरद पवारांचा भर आहे. त्यामुळे युतीच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यानंतरच शरद पवार उमेदवार जाहीर करणार आहेत. शिंदेसेना }८० च्या आत जागांवर समाधान शक्य भाजपने शिंदेसेनेला ८० पर्यंतच जागा देण्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शुक्रवारी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतील. त्यानंतर शनिवारी शिंदेसेनेच्या विद्यमान आमदारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर होईल. अजितदादा गट }६० च्या आत जागांवर बोळवण अजित पवार गटाने ८० जागा मागितल्या असल्या तरी भाजप ६० पेक्षा जास्त एकही जागा देणार नाही. त्यामुळे भाजप व शिंदेसेनेची यादी जाहीर झाल्यानंतरच दादा यादी जाहीर करतील. त्यातही आमदारांची नावे प्राधान्याने असतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article