भाज्यांच्या किमती अजूनही गगनाला भिडलेल्या:सर्वांच्याच दराने गाठली शंभरी; उशिरा थंडी पडल्याने किमतीवर परिणाम

6 hours ago 1
सर्वसाधारणत: हिवाळा सुरू झाला की नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात भाज्यांच्या किंमती कमी होतात. मात्र, यावर्षी नोव्हेंबर संपायला आता तरी बाजारात भाज्यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. सर्व भाज्यांनी जवळपास शंभरी गाठली आहे. यामुळे नागरिकांना भाजी खरेदी करताना मोठा प्रश्न पडतो आहे. यंदा मान्सून संपल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी पिकांची आवक घटली. दरम्यान सण उत्सवही सुरू होते. आता नवीन पीक बाजारात दाखल होईपर्यंत भाज्यांचे दर चढेच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यावेळी नव्याने येणारा भाजीपाला बाजारात दाखल व्हायला सुरुवात होईल, तेव्हा टप्प्याटप्प्याने या दरात घसरण बघायला मिळेल, अशे विक्रेते सांगतात. आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांचे दर अचानक वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते आहे. तसेच गृहिणींचे बजेट देखील कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोचा दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा होता. आता हाच दर आता ८० ते ९० रुपयांवर पोहोचला आहे. बिन्सची किंमत ८० ते १०० रुपये झाली आहे. १ किलो शेवग्याचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. भेंडीची किंमत ७० ते ९० आणि फ्लॉवरची किंमत १२० रुपयांवर पोहोचली आहे. प्रतिकिलो कोबीचा भाव ८० ते ९० आणि प्रतिकिलो, ढोबळी मिरची ११० ते १२० आणि कारल्याचे दर १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे बजेट कोलमडले आहे. भाजी दर (किलो) बटाटे ५०-६० रुपये गवार ८०-९० रुपये शिमला ८०-१०० रुपये वांगे ६० ते ७० रुपये शेवगा १८०-२०० रुपये फळ दर पेरू ५०-८० रु. सफरचंद ८०-१०० रु. पपई ५०-६० रु. मोसंबी ५०-८० रु. संत्री ५०-७० रु. बाजारात पुरवठा कमी यंदा थंडी उशीरा सुरू झाली आहे. उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. मार्केटमध्ये भाज्यांचा पुरवठा होत न सल्याने दर गगनाला भिडले आहेत. यामुळे आता भाज्यांचे दर कधी कमी होतील, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. असे आहेत भाज्यांचे दर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article