मंगळसूत्र चोरांना अटक; दीड महिन्यात सात गुन्हे:एलसीबीची कारवाई, चार जणांवर केली कारवाई
2 hours ago
2
ग्रामिण भागात शेतात जाणाऱ्या किंवा निर्मणुष्य रस्त्याने पायी एकट्या जाणाऱ्या महिलांना हेरून चाकुच्या धाकावर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पोथ, सोनसाखळी लूटणाऱ्या चौकडीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. ही कारवाई मंगळवारी सांयकाळपासून बुधवारी (दि. २७) पहाटेपर्यंत करण्यात आली आहे. मो. शाहरुख मो. रफीक (२२, रा. अडगाव खाडे, ता. अंजनगाव सुर्जी, ह. मु. मुस्कान नगर, अमरावती), मो. शोएब मो. सलीम (२३, रा. मुस्कान नगर), सैय्यद मोहसीन सैय्यद हसन (२७, रा. पठाण चौक, अमरावती) आणि जावेद खान जाकीर खान (२३, रा. अलकरिम नगर नं. २, सर्व रा. अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी नांदगाव खंडेश्वर व तळेगाव दशासर येथील प्रत्येकी एक, चांदुररेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन व वलगाव ठाण्याच्या हद्दीतील दोन अशा एकूण जबरी चोरीच्या सात गुन्हयांची कबुली दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी बुधवारी प्रसार माध्यमांना दिली. यातील मुख्य आरोपी मो. शाहरुख हा कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने अन्य साथीदारांसमवेत जिल्हयाच्या ग्रामीण भागातील महिलांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून तो मौजमस्ती करत होता, नेमके पोलिसांनी तेच हेरले आणि त्याच्यासह चौघेही पोलिसांच्या हाती आले. आरोपींनी तळेगाव हद्दीतील बग्गी येथे १९ नोव्हेंबर रोजी रोजी एकट्या जाणाऱ्या उर्वरित, पान ४ पिवळ्या रंगाच्या जर्कींनने दिला सुगावा चार आरोपीपैकी एकाने गुन्हा करतेवेळी पिवळ्या रंगाचे जर्कीन घातले होते. पोलिसांना एका ठिकाणी सीसीटीव्हीत तसे दिसले होते. दरम्यान इतरही माध्यमातून पोलिस आरोपींचा शोध घेतच होते. याचदरम्यान पिवळ्या जर्कीनच्या आधारे पोलिसांनी पहिला आरोपी उचलला आणि चौकडी पकडण्यात पोलिसांना यश आले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)