पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिंचे गटाला विजय मिळताच मस्तीत आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला हाताशी धरून रेल्वे स्टेशन रोडवरील चौकात शिवसेना शाखेच्या वतीने बांधण्यात आलेला शिवसेनेचा स्तंभ हटवून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा स्तंभ उभारण्याचा डाव आखण्यात आला आहे. त्यासाठी गोरगरिांना दहा रुपयांत शिवभोजन देणारी हातगाडी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून हटविण्यात आली. मात्र, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेताच पथकाने तातडीने हातगाडी सोडून दिली.
पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली आहे. या निवडणुकीत सिंघे गटाने बिजय मिळवताच त्यांच्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन भागातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्टेशन भागात असलेल्या इमारतीच्या ऑड स्पेसच्या जागेत अनेक वर्षांपासून शिवसेना शाखा स्थापन करण्यात आली आहे. या शिवसेना शाखेच्या ठिकाणी शिवसेनेचा स्तंभ उभारून त्याठिकाणी शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा ठेवून भगवा ध्वज लावण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते शिवसेना स्तंभाचे उद्घाटन देखील करण्यात आले. याच जागेवर आता मिंधे गटाकडून आनंद दिघे यांचा स्तंभ उभारण्याचा डाब आखण्यात आला आहे. त्यासाठी तयारी देखील केली जात आहे. मात्र, या ठिकाणी लाबण्यात आलेली शिवभोजनची हातगाडी हटविण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले. या वरिष्ठ अधिकाऱ्याने मिंधे गटाच्या पदाधिकान्याने कारवाई करण्याचे सांगताच तातडीने अतिक्रमण हटाव पथकाचे इमारत निरीक्षक तथा भरारी पथकातील रकेंद्र देसाई आणि घोडके हे पथकात्य घेऊन त्या ठिकाणी धावत आले. या पथकाने गोरगरिबांसाठी दहा रुपयांत जेवण देणारी शिवभोजनची हातगाडी उचलून वाहनात टाकली. केवळ एवढयाच कारवाईसाठी संपूर्ण पथक कामाला लावले. वास्तविक या शिवभोजनच्या हातगाडीचा कुणालाही अडथळा नाही. या समोरच रस्त्याच्या बाजूला फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या असतानाही त्यांच्यावर मात्र कारवाई केल्या गेली नाही, अतिक्रमण काढताना रस्त्याला अडथळा ठरणारे सर्व अतिक्रमण काढणे नियमानुसार आवश्यक आहे. तरी देखील मनपाच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशावरून केवळ शिवसैनिकाची शिवभोजनची हातगाडी हटविण्याची मर्दुमकी दाखवली.मनपाच्या वरिष्ठ अधिकान्याने तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यानुसार पथकाने शिवभोजनची हातगाडी उचलण्यात आल्याचे पथकातील इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांनी सांगितले.
शिवसेना पदाधिकारी झाले आक्रमक
मनपाचे अतिक्रमण हटाव पथक केवळ एकच कारवाई करीत असल्याचे पाहताच शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश कमलानी यांनी शिवभोजन हातगाडी घेऊन जाणाऱ्या पथकाकडे विचारले असता वरिष्ठांच्या आदेशावरून ही कारवाई केली जात असल्याचे पथकातील अधिकान्याने सांगितले. कमलानी यांनी तातडीने महानगरप्रमुख राजू वैद्य, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे यांच्याशी संपर्क साधून केवळ मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने शिवसैनिकाने सुरू केलेली शिवभोजनची हातगाडी उचलण्याची कारवाई केली. इतर कोणतेही अतिक्रमण काढण्यात आले नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होताच अतिक्रमण हटाव पथकाने शिवभोजनची हातगाडी सोडून दिली असल्याचे कमलानी यांनी सांगितले.