मराठा आरक्षणास आपला विरोध नाही. मराठा समाजास ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे, असा दावा ओबीसी नेते छगन भुजबळ करत असतात. परंतु प्रत्याक्षात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रस्ताव आला तेव्हा छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणास विरोध केला होतो, असा गौप्यस्फोट खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. मराठा समाजाच्या महासंमेलनात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्यासमोर अडचणी वाढणार आहेत.
महासंमेलनात बोलतान नारायण राणे म्हणाले की, मराठा समाजाने आपण कुठे उभे आहोत याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाची लोकसंख्या 30 टक्के आहे. परंतु आयएएस, आयपीएसमध्ये 15 टक्के युवक आहेत. दारिद्ररेषेखाली मराठा समाजाची लोकसंख्या 22 टक्के आहे. शेतीपासून राजकारणात आपला समाज कुठे आहे. या सर्व बाबींचा विचार करायला हवा, असे राणे यांनी म्हटले.
भुजबळ यांचा दावा ठरवला फोल
मराठा आरक्षण संदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला त्यावेळेला काय किस्सा घडला तो नारायण राणे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी समिती नेमली. त्याचे अध्यक्ष मला केले. मराठ्यांना आरक्षण देणार ही माझी अध्यक्ष म्हणून भूमिका होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मला फोन आला. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये, असे भुजबळ साहेबांनी पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर भुजबळ यांना मी फोन केला आणि विनंती केली अन् सांगितले, आम्ही कुठल्याही समाजाचे आरक्षण घेत नाही. घटनेच्या १४ (४) आणि १५ (४) प्रमाणे नियमानुसार मागासवर्ग म्हणून आरक्षण मिळावे. १६ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. भुजबळ यांनी समजवले. त्यानंतर प्रस्ताव आला. त्यावेळी बैठकीत कोणी या विषयावर बोलण्यास तयार नव्हते. परंतु मी विषय रेटून नेला आणि संमत केला.
हे सुद्धा वाचा
मलाही इन्कम टॅक्स कार्यालयात नोकरी करून मला पंधराशे रुपये मिळायचे आहे. मला चिकनचा व्यवसाय करून मला दिवसाला 65 रुपये नफा मिळात होते. त्यामुळे मी रागाने इन्कम टॅक्स विभागातील नोकरी सोडली. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानतो. मग त्यांचे गुण का घेत नाही? असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारले. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाने उद्योगाकडे लक्ष द्यावे, त्याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.