‘मध्य’मध्ये विभाजन, ‘पूर्व’त ध्रुवीकरण:पक्षफुटीमुळे हिंदू मतांचे दिसले विभाजन, मुस्लिम मतदारांचा मात्र निर्णायक कौल
6 hours ago
1
पूर्व मतदारसंघात सकाळी संथगतीने मतदान झाले, तर १० वाजेनंतर मतदानाने गती घेतली. पुन्हा दुपारी २ ते ४ या काळात मतदानाची गती मंदावली. मुस्लिम वसाहतींमध्ये मतदानापूर्वीच रांगा लावलेल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये तिरंगी वाटणारी लढत अतुल सावे आणि इम्तियाज जलील यांच्यापर्यंतच सीमित राहिली. एआयएमआयएमचे मतीन पटेल व अपक्ष बॅट निशाणी असलेले गुड्डू पटेल यांच्यात झडप झाली. राखीव सैन्य दलानेे दोन्ही गटांना तेथून हुसकावून लावले. सावे, जलील, वंचितचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांच्यात प्रमुख लढत होती.
संथगतीने मतदान सकाळी ७ ते ९ वाजता पुरुष १०.१३ तर महिला ८.१९ टक्के मतदान झाले. ११ वाजेपर्यंत पुरुष २२.६३ तर स्त्रिया १९.०३ टक्के ११ ते १ पुरुष ३५.६६ तर महिला ३१.१४ टक्के, १ ते ३ या वेळेत पुरुष ४६.८२ तर महिला ४२.४१ इतर २८.५६ एकूण ४४.४८ टक्के मतदान झाले. ३ ते ५ या वेळेत पुरुष ५७.०६ महिला ५४.३७ असे मतदान झाले. उच्चभ्रू वसाहतीत कमी मतदान उच्चभ्रू वसाहतींमध्ये मतदानास अत्यल्प प्रतिसाद होता. सकाळी १० वाजता केवळ १० ते १२ टक्के इतके मतदान होते. दुपारी १ वाजता ३० ते ३३ टक्के इतके मतदान विविध मतदान केंद्रांवर होते. मध्यमवर्गीय वसाहतींमध्येही मतदानाची संथगतीने सुरुवात झाली. याउलट मुस्लिम परिसरात चित्र उलटे होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)