Maharani Lakshmibai Medical College Hospital Fire : एका हॉस्पिटलच्या NICU विभागात शुक्रवारी रात्री भीषण आग भडकली. या दुर्घटनेत 10 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 16 मुलं जखमी झाली आहेत. NICU हा लहान मुलांचा वॉर्ड आहे.
jhansi maharani lakshmibai aesculapian assemblage infirmary fire
महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली. या आगीत होरपळून 10 मुलांचा मृत्यू झाला आहे, 16 जखमी झालेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या NICU मध्ये शुक्रवार रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. जिल्हाधिकारी (डीएम) अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये हे हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं डीएमने सांगितलं. चिंताजनक प्रकृती असलेल्या बालकांना NICU मध्ये ठेवलं जातं. NICU च्या अंतर्गत विभागात 30 मुलं होती. त्यातील बहुतांश बालकांना वाचवलं असं झांसीचे कमिश्नर बिमल कुमार दुबे यांनी सांगितलं. झांसीचे वरिष्ठ पुलिस अधिक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी सांगितलं की, 16 मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनेच्यावेळी NICU मध्ये 50 पेक्षा जास्ता मुलं होती.
(बातमी अपडेट होत आहे)