महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदी नियुक्ती झाल्यानंतर आणि त्यानंतर लगेचच या पदावरून हटवण्यात आल्याने अभिनेत्री ममता कुलकर्णी चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ममताने अनेक खुलासे केले आहेत. ममता कुलकर्णीने आता तिच्या शेवटच्या बिहार दौऱ्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ममताने दावा केला की, RJD नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अभिनेत्रीला राज्यसभेसाठी ऑफर दिली होती.
‘आज की अदालत’ मध्ये पोहोचलेल्या ममता कुलकर्णी हिने बिहार दौऱ्याबद्दल मोठा खुलासा आहे. ममता एका कार्यक्रमासाठी गोवा येथे होती. तेव्हा अभिनेत्रीच्या मॅनजरने सांगितलं, तत्काळ बिहार याठिकाणी जावं लागेल…
ममता म्हणाली, ‘बिहार येथे भयानक परिस्थिती होती… याची मला काहीही कल्पना नव्हती.’ ममता तिच्या 10 लोकांच्या टीमसोबत बिहारसाठी रवाना झाली. आल्यानंतरच ममता आणि टीमला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आलं. अभिनेत्रीने ड्रायव्हरला काही छोट्या कामासाठी थांबायला सांगितल्यावर त्याने नकार दिला आणि ‘मॅडम, आपण इथे थांबू शकत नाही.’ हा नक्षलग्रस्त भाग आहे. ड्रायव्हरच्या या कमेंटने ती घाबरली आणि अभिनेत्रीचं हृदय भीतीने धडधडू लागले.
हे सुद्धा वाचा
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर देखील अभिनेत्रीला भयानक दृष्य दिसलं. अभिनेत्रीने सर्वत्र अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहिली जी नेहमीपेक्षा खूपच वेगळी होती, सुमारे 100 सशस्त्र दल तिथे तैनात होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर तिथली अवस्था पाहून ती घाबरली.
ड्रेसिंग रुममध्ये देखील प्रचंड गर्दी होती. ममता हिला तयार होण्यासाठी देखील नव्हती. अशात त्रस्त होत अभिनेत्रीने मॅनेजरला विचारलं, ‘शो बिहारमध्ये का ठेवला?’, अखेर कार्यक्रम संपताच, त्यांना सांगण्यात आलं की, एक फ्लाइट चुकल्यानंतर सात दिवस आणखी प्रतीक्षा करावी लागले.
अभिनेत्री म्हणाली, ‘मला आठवत आहे, तेव्हा मी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जेणेकरून परिस्थितीतून सुखरुप बाहेर पडू शकेल.. . विमानाने उड्डाण घेतल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला…’ सध्या सर्वत्र ममका कुलकर्णीची चर्चा रंगली आहे.
लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल काय म्हणाली ममता?
ममता म्हणाली, ‘मला लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांच्या राजकीय कामगिरीबद्दल देखील मला माहिती नव्हती. जेव्हा मला त्यांनी राज्यसभेसाठी ऑफर दिली, तेव्हा मला त्यांच्याबद्दल कळलं. पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण राजकारणाची आवड मला कधीच नव्हती आणि आता देखील नाहीये…’ सध्या ममता तुफान चर्चेत आहे.