प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी जात असताना अनियंत्रित बसने कारला धडक दिल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये दूदू परिसरात ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बसचा टायर फाटल्याने बस अनियंत्रित झाली. नियंत्रण सुटल्याने डिव्हायरच्या दुसऱ्या बाजूला जात कारला धडकली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. सर्वजण भीलवाडा जिल्ह्यातील कोटडी येथील रहिवासी होते. दिनेश रेगर, नारायण, बबलू मेवाडा, किशन, रविकांत, प्रमोद सुथार, बाबू रेगर आणि प्रकाश मेवाडा अशी मयतांची नावे आहेत.