महाराष्ट्रात महायुती की मविआ?:विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या सामान्यांची बेधडक मते, फक्त दिव्य मराठी डिजिटलवर
1 hour ago
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे चार दिवस, तर प्रचारासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. मतदान असे तोंडावर आलेले असताना या निवडणुकीत जनतेचा कल कोणाकडे राहणार, सर्वसामान्य नागरिकांच नेमक म्हणणं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी सर्वसामान्यांनी कोणतेही सरकार आले तरी महागाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील 288 जागांवर एका टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यात आठवड्याभरात नवं सरकार स्थापन होणार आहे. राज्यात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा महायुती गाठणार की महाविकास आघाडी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महायुतीत तीन पक्ष आहेत. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी. तर महाविकास आघाडीतही तीन पक्ष आहेत. एक म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी. या दोन्ही आघाड्यांना काही छोट्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. दोन्ही आघाड्या मजबूत स्थितीत आहे. महायुती राज्यात सत्तेत आहे. तर महाविकास आघाडी प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीतील लढत अत्यंत तुल्यबळ ठरणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)