माजलगाव येथील तौहिद खानची रिअल क्रिकेट टॅलेंटमध्ये निवडFile Photo
Published on
:
07 Feb 2025, 10:57 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:57 am
माजलगाव : पुढारी वृत्तसेवा
रियल क्रिकेट टॅलेंट RCT, जयपूर येथे होणाऱ्या सामन्यासाठी माजलगावातील तौहिद मिरवाज खान (जुगा) याची निवड झाली आहे. तौहिद हा सध्या सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. माजलगावच्या तौहिद खानने बीड जिल्ह्यात होणाऱ्या अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर नुकतीच राज्यातील उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. त्या निवड चाचणीत तौहिदने सहभाग घेतला होता. या निवड चाचणीतून त्याचे राजस्थान (जयपूर) रियल क्रिकेट टॅलेंट संघात निवड झाली. सदरील जयपूर क्रिकेटच्या वतीने तौहीद यास पुढील सामन्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या निवडीने त्याच्यावर क्रिकेट प्रेमींकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.